राष्ट्रीय विचारांचा शिक्षणप्रसार व समाजप्रबोधनाचा वसा घेऊन शिक्षण आणि पत्रकारितेच्या क्षेत्रात एकत्रितपणे पायाभूत कार्य करणारे लोकमान्य टिळक आणि गोपाळ गणेश आगरकर हे दोघे मूळचे जीवश्चकंठश्च मित्र. पुढे त्यांच्यात ‘आधी राजकीय सुधारणा की आधी सामाजिक सुधारणा’ यावरून वाद उद्भवला. त्यावरून त्यांच्यात असलेले मतभेद टोकाला गेले आणि ते एकमेकांपासून दुरावले.
तेव्हा आम्ही टिळक प्रेमात असल्याने आगरकर समजवून घेण्याचा ना आम्ही प्रयत्न केला ना कुठल्या राजकीय विचारधारेने समजावून दिला. सामाजिक सुधारणा ही गोष्ट खूप मोठी आहे. जी दर पाच वर्षांनी आपल्या निवडणुकीच्या जाहीरनाम्यात आश्वासन म्हणून येते तीच गोष्ट आहे ही !
आज राजकारणाबद्दल आणि विशेषतः 2019 नंतर महाराष्ट्राच्या राजकीय कार्यकर्त्यांच्या आततायीपणामुळे कमी झालेल्या आदरात भाजपचे नितीन गडकरी हे नाव तुम्हाला अजूनही एक प्रकाशवाट दाखवते. तुम्ही कुठल्याही राजकीय विचारधारेचे असलात तरी या माणसाचा दुस्वास करणारा एकही विरोधक सापडणार नाही. नितीन गडकरी यांनी हे सत्तेत राहुन नाही तर माणूस म्हणून मंत्रिपदाचा सकारात्मक वापर करत कमवलय !
एकदम मोकळे बोलणे पण कधीही कसलाच सवंगपणा नाही, राज्य सरकारला चार शब्द सुनवताना कधी कसला विखार नाही.. आणि सगळ्यात महत्वाचे म्हणजे जर कधी यांच्या नेतृत्वावर आरोप झाले तर ते शंभर टक्के विरोधकांनी नाही तर अंतर्गत राजकारण आहे हा जो तमाम महाराष्ट्राचा विश्वास आहे ना तो कमवायला तुम्ही कायम लोकांबरोबर आणि लोकांसाठी असला पाहिजेत !
नितीनजी तुम्हाला उदंड आयुष्य लाभू दे. मला माहित आहे, इथं लिहिलेल्या शुभेच्छा तुमच्या पर्यंत पोहोचणार नाही, पण ज्याचे शब्द त्याला पोहोचत नाहीत तोपर्यत आभाळभर फिरत राहतात म्हणे..
म्हणूनच वाढदिवसाच्या आभाळभर शुभेच्छा सर..

إرسال تعليق